[Image 269.jpg]
आयुष्यात भेटलेली देव माणसं
2004 सालची गोष्ट आहे. मी तसा कॉमर्स साईडचा विद्यार्थी पण आम्ही जातीने सुतार असल्याने तांत्रिक कामात भयंकर आवड, आमचे वडील साखरखान्यातील अॉलीव्हर फिल्टर दुरुस्ती कामात प्रख्यात कारागीर होते, त्यांच्या कडून बाळ कडु आम्हाला मिळाले त्यांच्या पाठोपाठ आम्ही या व्यवसायात 1989 उडी मारली. अत्यंत प्रामाणिक पणे कामे करण्याची शिकवण आमच्या वडीलांचीच, त्यामुळे अपयश कधी माहीतच पडलं नाही. 2004 दरम्यान माझे काम जवाहर कारखाना मधे चालु होते, तेथे माझी भेट चिफ् केमिस्ट श्री. गुरुराव कुदळे यांची झाली. दररोज कामा बाबत चर्चा होत असत त्यामुळे सलगी वाढत गेली. त्यांनी माझ्यातील तंत्रज्ञानाचे गुण ओढुन, मला एकदा विचारलं की "तु अॉलीव्हर चे अवघड काम करतोस, तर या शेजारीच असलेल्या ज्युस क्लॉरिफायर काम दिले तर करशील का?" मी त्या वेळी त्या कामात अनभिज्ञ होतो, मला कसलाही पुसटशी कल्पना त्या युनिट बाबत नव्हती. परंतु मी सहजच बोलून गेलो, संधी दिलीत तर करुन दाखवुन. मग ते म्हणाले आपण एके दिवशी गोकाकला जाऊ, नविन सतिश शुगर कारखाना होतोय. काही महीन्याने आम्ही दोघे कारखान्यावर गेलो. मी जरा बावरलेल्या स्थितीत साहेबांना म्हटलं "मला जमेल का हो?" ते म्हणाले " मी आहे की काय अडलं तर" मला जरा आधार मिळाला. मग तेथील जनरल मॅनेजर श्री कारगी साहेब यांची भेट झाली कुदळे साहेब व कारगी साहेब मित्र असल्याने त्यांच्या कन्नड मधे गप्पा चालू होत्या, बोलणं पुर्ण झाल्यावर कारगी साहेब म्हणाले काय सुतार काम करणार का? मी म्हटले करतो की साहेब. कामाचे दर दाम ठरवुन माझ्या समोर आॅर्डरच ठेवली आणी वाचारलं अॅडव्हान्स कीती पाहिजे? मी करीन तसे मला पेमेंट करा. कारण मी इतका गोंधळुन गेलो की इतक्या सहजतेने मला मोठी आॅर्डर मिळाली कशी? पण हे सत्य होत. मला आव्हानात्मक होत, पण संधी चालून आली होती, आणि माघार घ्यायची मला माहीत नव्हतं. आणि सोबतीला कुदळें ची साथ आहे म्हटल्यावर ध्येय निश्चित केले की, हे काम करायचेच. ज्युस क्लॉरिफायर चे काम हे आपल्या भारतात फक्त चारच कंपन्यां करतात, आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच मला संधी मिळाली त्या मुळे आव्हान पेलण्यासाठी तयार झालो. त्या दिवशी पासून माहीती संकलन करत राहीलो. युनीट विषयीची धोके फायदे या सर्व गोष्टींचा चर्चा कुदळे यांनी सांगितली व मार्गदर्शन केले. आता आत्मविश्वास वाढला होता.
काम सुरू करण्याची तयारी करून, काम चालु केले पहिल्या टप्प्यात फॅब्रीकेशन केले, नंतर ते इरेक्शन केले सर्वांना कामाची पध्दत आवडली. मग माझा उत्साह आणखीन वाढला. मी माझा सहकारी सदाशिव सर्वस्व झोकुन काम करत होतो. अहोरात्र मेहनतीने सर्व काम परिपूर्ण केल, वाॅटर ट्रायल पहिल्या टप्प्यात ओकै झाली. युनीट लाईन वर घेवून आम्ही निरधास्त झालो. आनंद गगनात मावत नव्हता. सर्वांनी भरभरून कौतुक केले. आमचा ऊर भरून आला, कारण, महाराष्ट्रात पहिल युनिट बनवण्याचा मान आम्हाला लाभला होता. या वेळी कुदळे साहेबांचा अप्रत्यक्ष हाथ माझ्या पाठी होता म्हणून शक्य झाले. साहेबांनी माझ्यातला तंत्रज्ञानाला दिलेली हाक मी सार्थ ठरवली याच समाधान वाटत होते. कुदळे यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे माझ्या गुणाला यशाची झालर मिळाली. त्यामुळे त्यांचे शतशः आभार आहोत. यावेळी बरेच ज्ञातअज्ञात साहेब लोकांनी मदत केली त्यां सर्वांचे मनापासून आभार व ऋणी आहे आज मला मटा या माध्यमातून थॅक्यु म्हणावयाचे आहे.
दिलीप सुतार
कसबा बावडा, कोल्हापूर
No comments:
Post a Comment