Friday, 8 June 2018

यात्रा बाबा आमरनाथची

           "यात्रा बाबा अमरनाथ"
------------------------------------------------
आम्ही बावडेकर बाबा अमरनाथ यात्रेकरीता जर वर्षे प्लान करतो, या आमचे जोतिबाला दर रविवारी पहाटे दर्शन जाणारे सहकारी मित्रांनी ठरवलं जायच, बाबा अमरनाथ दर्शनाला पाचजणांची तयारी झाली. मी स्वतः, राज पाटील, नितीन पारखे, शितल, प्रशांत नावडे, आम्ही रेल्वेने प्रवास सुरू केला,श्रीनगरला पोहचलो, तेथून गाडी ठरवली व बेस कॅम्प वर  पोहचलो प्रवास    खुप झालेन थोडीशी विश्रांती घेऊन फ्रेश होऊन साधारण 8/9 वाजता चढाई सुरुवात करायची होती, वेळ सकाळीची असल्याने भंडारा मधे सर्वजण नाश्ता करून चालत होते. भंडारा मधे विविध प्रकारच्या मेजवानीच असते त्याचा आस्वाद घेत आता खरी चढाईला सुरुवात होते जय बाबा अमरनाथ गजर करीत यात्रा सुरू झाली. अत्यंत कठीण खडतर चढाई असल्याने जयघोष करीत चालण चालू ठेवलं.
      सर्वजण बरोबर चालत होतो आमचे सह असंख्य यात्रेकरू चालत होते, पहील्या टप्प्यातच दमछाक होत होती, साधारणपणे आम्ही एक तास चालल्यानंतर आमच्या मधील दोघेजण खुपच दमलेले दिसत होते आणि म्हणू लागले "आता चढाई करणे अशक्य आहे बाबा" आम्ही सर्वजण थोडा वेळ विश्रांती घेऊन मग पुढे जाऊ अस ठरवलं, 10/15 मिनिटे विश्रांतीनंतर चला निघु आता, पण जे दमलेले दोघे म्हणाले आम्हाला शक्य नाही होणार, अजुन कीती वेळ चालायला लागेल याचा अंदाज नाही, आम्ही घोड्यावर बसून येतो, आम्ही सगळे विनंती केली करू लागलो हळूहळू चालू पण चालत जाऊ....
       तितक्या एक अंदाजे 55/60 वर्षे वय असलेला गृहस्थ चालत येत होता, तो बाबा अमरनाथ गजर करीत चालत होता "बंब भोले, बाबा अमरनाथ की जय हो" लांबून तो जरा अडखळत चालत असल्या सारखा वाटत होता, जसजसा तो जवळ आला, आम्ही आश्चर्य चकीत झालो, कारण असे की या गृहस्थाचे पाय पाहीले तर दोन्ही पाय आतील बाजूस वळलेले असून हा गृहस्थ एक तास अंतर इतक्या सहजपणे वर चढाई करत उत्साहाने चालत होता. मी तर आवाक् झालो. सर्वच आम्ही अचंबित झालो. मग आम्ही त्याची विचारपूस केली आणि ते म्हणाले मी जर वर्षे बाबा अमरनाथ यात्रा करतो. या देवावर माझी आगाध श्रद्धा आहे. आम्ही म्हणालो "बाबा तुमचे पाय असे असुनही कसे चालता हो" त्यावर त्यांनी सांगितले "देवाची इच्छा मला कधीही त्रास वाटला नाही या यात्रेचा" आणि त्या गृहस्थाने परत आपली यात्रा सुरू केली
  मी आमचे सहकारी मित्र चर्चा करू लागलो "जर असा अपंग व्यक्ती जर यात्रा परिपूर्ण करीत असेल तर आपण तर धडधाकट आहे, आपण का नाही यात्रा पुर्ण करू शकत?" मग आम्हाला नवीन उर्जा मिळाली आणि आम्ही यात्रेस सुरूवात केली ते दोन टप्प्यात विश्रांती घेत दुपारी तीन वाजता अमरनाथ गुहा दिसु लागली. तेव्हा उत्साहात भर पडत गेली. मग बर्फाच्छादित पहाडवरून चालण्याचा एक विलक्षण आनंद मिळत होता. आता गुहे पर्यंत पोहचलो. थोडा आराम केला आणि मग बर्फाच्छादित शिवलिंगाचे दर्शन झाले. मन प्रसन्न झाले. देवाची प्रार्थना केली, प्रसाद घेतला, देवाकडे मागन घातले "असच आमच मनोधैर्य उंच राहु दे" आणी परत प्रवास दुसर्‍या दिवशी पहाटे चार वाजता चालु केला.
तात्पर्य या प्रसंगातून एक बोध असा की    "एखाद्याची श्रद्धा इतकी दाट असलेवर कोणतीही गोष्ट आयुष्यात अशक्य नाही"
"जय बाबा अमरनाथ "
दिलीप सुतार
कसबा बावडा, कोल्हापूर
गृहस्थाचा फोटो
[Image 226.jpg]
[Image 228.jpg]
[Image 229.jpg]

No comments:

Post a Comment