Friday, 8 June 2018

एका लग्नाची गोष्ट

            एका लग्नाची गोष्ट
------------------------------------------------मी नुकताच कमवायला शिकलो. मग घरातील मंडळी लग्न करायची बातचीत करु लागली. आमचे आबा एक मुलगी पाहून आले, मग आम्ही घरातील सर्व जण जाऊन लग्न ठरवले. तारीख ठरली 30-11-1993 लग्न मुक्काम सांगली, बुजगावणे येथे मुली कडे.
   जसजशी लग्नाची तारीख जवळ आली, तशी घाई गडबड चालु होती. व्हराडा करीता एस.टी ठरवली व माझ्या करीता गाडी दादांच्या मित्र श्री दिलीप मडके याची मारुती 800 कार आणली होती. गाडी चालवणारा माझा मित्र होता आप्पा मग लग्नाचा दिवस उजाडला आमच्या घरी सकाळी लवकर हळदीचा कार्यक्रम केला, मला मुंडावळ्या बांधून करवली बरोबर दोन बायका व एस.टी अस व्हराड बाहेर पडले. बुधगाव वेशीवर पोहचलो, आप्पा व्हराड आलय म्हणून सांगायला गेला, तेवढ्यात माझ्या डोक्यात एक कल्पना आली, आपण जरा गाडी चालवुया, नाहीतर ही गाडी काय परत परत येणार नाही, मी तर मुंडावळ्या बांधून होतो. मग ड्रायव्हर सिटवर बसलो. करवली इतर मंडळी घाबरले, तरी मी स्टार्टर फिरवला गाडी सुरू झाली हळुहळु गाडी चालवत पुढे नेली, पहिल्यांदाच गाडी चालवताना आनंद झाला. ती याद अजूनही आहे गाडी शिकलो त्या दिवशी माझ्या डोक्याला
[Image 243.jpg]

No comments:

Post a Comment