Friday 8 June 2018

देव माणसं

[Image 269.jpg]
 आयुष्यात भेटलेली देव माणसं
2004 सालची गोष्ट आहे. मी तसा कॉमर्स साईडचा विद्यार्थी पण आम्ही जातीने सुतार असल्याने तांत्रिक कामात भयंकर आवड, आमचे वडील साखरखान्यातील अॉलीव्हर फिल्टर दुरुस्ती कामात प्रख्यात कारागीर होते, त्यांच्या कडून बाळ कडु आम्हाला मिळाले त्यांच्या पाठोपाठ आम्ही या व्यवसायात 1989 उडी मारली. अत्यंत प्रामाणिक पणे कामे करण्याची शिकवण आमच्या वडीलांचीच, त्यामुळे अपयश कधी माहीतच पडलं नाही. 2004 दरम्यान माझे काम जवाहर कारखाना मधे चालु होते, तेथे माझी भेट चिफ् केमिस्ट श्री. गुरुराव कुदळे यांची झाली. दररोज कामा बाबत चर्चा होत असत त्यामुळे सलगी वाढत गेली. त्यांनी माझ्यातील तंत्रज्ञानाचे गुण ओढुन, मला एकदा विचारलं की "तु अॉलीव्हर चे अवघड काम करतोस, तर या शेजारीच असलेल्या ज्युस क्लॉरिफायर काम दिले तर करशील का?" मी त्या वेळी त्या कामात अनभिज्ञ होतो, मला कसलाही पुसटशी कल्पना त्या युनिट बाबत नव्हती. परंतु मी सहजच बोलून गेलो, संधी दिलीत तर करुन दाखवुन. मग ते म्हणाले आपण एके दिवशी गोकाकला जाऊ, नविन सतिश शुगर कारखाना होतोय. काही महीन्याने आम्ही दोघे कारखान्यावर गेलो. मी जरा बावरलेल्या स्थितीत साहेबांना म्हटलं "मला जमेल का हो?" ते म्हणाले " मी आहे की काय अडलं तर" मला जरा आधार मिळाला. मग तेथील जनरल मॅनेजर  श्री कारगी साहेब यांची भेट झाली कुदळे साहेब व कारगी साहेब मित्र असल्याने त्यांच्या कन्नड मधे गप्पा चालू होत्या, बोलणं पुर्ण झाल्यावर कारगी साहेब म्हणाले काय सुतार काम करणार का? मी म्हटले करतो की साहेब. कामाचे दर दाम ठरवुन माझ्या समोर आॅर्डरच ठेवली आणी वाचारलं अ‍ॅडव्हान्स कीती पाहिजे? मी करीन तसे मला पेमेंट करा. कारण मी इतका गोंधळुन गेलो की इतक्या सहजतेने मला मोठी आॅर्डर मिळाली कशी? पण हे सत्य होत. मला आव्हानात्मक होत, पण संधी चालून आली होती, आणि माघार घ्यायची मला माहीत नव्हतं. आणि सोबतीला कुदळें ची साथ आहे म्हटल्यावर ध्येय निश्चित केले की, हे काम करायचेच. ज्युस क्लॉरिफायर चे काम हे आपल्या भारतात फक्त चारच कंपन्यां करतात, आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच मला संधी मिळाली त्या मुळे आव्हान पेलण्यासाठी तयार झालो. त्या दिवशी पासून माहीती संकलन करत राहीलो. युनीट विषयीची धोके फायदे या सर्व गोष्टींचा चर्चा कुदळे यांनी सांगितली व मार्गदर्शन केले. आता आत्मविश्वास वाढला होता.
काम सुरू करण्याची तयारी करून, काम चालु केले पहिल्या टप्प्यात फॅब्रीकेशन केले, नंतर ते इरेक्शन केले सर्वांना कामाची पध्दत आवडली. मग माझा उत्साह आणखीन वाढला. मी माझा सहकारी सदाशिव सर्वस्व झोकुन काम करत होतो. अहोरात्र मेहनतीने सर्व काम परिपूर्ण केल, वाॅटर ट्रायल पहिल्या टप्प्यात ओकै झाली. युनीट लाईन वर घेवून आम्ही निरधास्त झालो. आनंद गगनात मावत नव्हता. सर्वांनी भरभरून कौतुक केले. आमचा ऊर भरून आला, कारण, महाराष्ट्रात पहिल युनिट बनवण्याचा मान आम्हाला लाभला होता. या वेळी कुदळे साहेबांचा अप्रत्यक्ष हाथ माझ्या पाठी होता म्हणून शक्य झाले. साहेबांनी माझ्यातला तंत्रज्ञानाला दिलेली हाक मी सार्थ ठरवली याच समाधान वाटत होते. कुदळे यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे माझ्या गुणाला यशाची झालर मिळाली. त्यामुळे त्यांचे शतशः आभार आहोत. यावेळी बरेच ज्ञातअज्ञात साहेब लोकांनी मदत केली त्यां सर्वांचे मनापासून आभार व ऋणी आहे आज मला मटा या माध्यमातून थॅक्यु म्हणावयाचे आहे.
दिलीप सुतार
कसबा बावडा, कोल्हापूर

उधारी दोन रुपयांची

.              उधारी 2 रुपयांची
------------------------------------------------
आम्ही सहा भावंड, एक भाऊ, चार बहीणी माझा नंबर पाचवा, अगदी सर्व सामान्य कुटुंब. वडील कडक शिस्तबद्ध, आई मायाळू पण वेळीच शिस्तीचा बडगा उगारनारी, आमचे वडील त्याना आम्ही आबा म्हणत, भयंकर मेहनती तसेच काटकसरी, बावडा शुगर मिल मधे  नोकरी करुन घरी आल्यावर सुतार काम करायचे. आम्ही सर्व भावंड शुगर मिल शाळेत शिक्षण घेत होतो.1980 काळात साधारणपणे माझ वय 10 असेल सहाव्या वर्गात असेन, थोरले बंधू इंजिनीअरिंग करत, बाकीचे वयाप्रमाणे शिक्षण चालू होते, मी लहान असल्याने घरातील बारीक सारीक किराणा सामान आणावयाच झालेस मलाच दुकानात धाडलं जायच, त्यात मी नुकताच सायकल शिकलो होतो, ते ही मधनं पाय घालुन, मग माझा दुकानात जायला उत्साह असायचा.
    एकदा आईने मला दोन रुपये दिले आणि सामान आणायला गुरवाच्या दुकानात पाठवले. मी सायकल काढली खिशात पैसे कोंबले आणि जोरात गेलो दुकानात, किराणा सामान घेतलं, मग पैसे देण्यास खिशात हात घातला. पण पैसे काय सापडणात सर्व खिसे तपासले, मग जरा जास्तच घाबरलो आणि सावरून गुरव मामांना म्हणालो "पैसे नंतर देतो" गुरव दुकानदार आमचे आबांचे चांगले ओळखीचे असल्याने त्यांनी मला सामान दिले. तसच मी सामान आईकड सुपूर्द केल आणि खेळायच्या नादात पार विसरून गेलो.
       काही दिवस गेले मी खेळत असताना घरी बोलावन आलं, घरी आलो  वडिल जरा रागात दिसलं, "कायरे उधारी कुठं केलीस " मी कुठं नाही केली" अस म्हणताच एक फटका एवढ्या जोरात बसला की माझी चड्डीच ओली झाली, मग माझ्या ध्यानात आले गुरवाची उधारी. मग मी म्हटलं माझ पैस पडलं म्हणून उधार आणले. मग आणखी फटका, मग माझी बहीण मधे पडली, कशी बशी सुटका झाली.  तरी वडील म्हणाले पैसे पडले तर त्या वेळी सांगायच उधारी का केलीस? आई पण म्हणाली "खर बोलला असतास तर हीनी मारलं नसत"
त्या दिवसापासून आज पर्यंत इतके व्यवहार पुर्ण केले, पण मी आजतागायत कधीही उधारीवर काहीहि वस्तू आणत नाही.
कारण आमच्या आबांनी लावलेली आम्हाला शिस्त आजही विसरलो नाही.
कारण, शिस्तीतुनच संस्कारांचा जन्म होतो
[Image 231.jpg]
दिलीप बापुसो सुतार, कसबा बावडा
[Image 232.jpg]

एका लग्नाची गोष्ट

            एका लग्नाची गोष्ट
------------------------------------------------मी नुकताच कमवायला शिकलो. मग घरातील मंडळी लग्न करायची बातचीत करु लागली. आमचे आबा एक मुलगी पाहून आले, मग आम्ही घरातील सर्व जण जाऊन लग्न ठरवले. तारीख ठरली 30-11-1993 लग्न मुक्काम सांगली, बुजगावणे येथे मुली कडे.
   जसजशी लग्नाची तारीख जवळ आली, तशी घाई गडबड चालु होती. व्हराडा करीता एस.टी ठरवली व माझ्या करीता गाडी दादांच्या मित्र श्री दिलीप मडके याची मारुती 800 कार आणली होती. गाडी चालवणारा माझा मित्र होता आप्पा मग लग्नाचा दिवस उजाडला आमच्या घरी सकाळी लवकर हळदीचा कार्यक्रम केला, मला मुंडावळ्या बांधून करवली बरोबर दोन बायका व एस.टी अस व्हराड बाहेर पडले. बुधगाव वेशीवर पोहचलो, आप्पा व्हराड आलय म्हणून सांगायला गेला, तेवढ्यात माझ्या डोक्यात एक कल्पना आली, आपण जरा गाडी चालवुया, नाहीतर ही गाडी काय परत परत येणार नाही, मी तर मुंडावळ्या बांधून होतो. मग ड्रायव्हर सिटवर बसलो. करवली इतर मंडळी घाबरले, तरी मी स्टार्टर फिरवला गाडी सुरू झाली हळुहळु गाडी चालवत पुढे नेली, पहिल्यांदाच गाडी चालवताना आनंद झाला. ती याद अजूनही आहे गाडी शिकलो त्या दिवशी माझ्या डोक्याला
[Image 243.jpg]

My Dad

my god my  vishawkarm my father
he make satisfied life, he make rule of life achievement for me for my family, my father in my blood & every part of my body, any one can discard her rules in my life also my thoughts he also say to all " pratekacha changale  kara , mhanje tumche changale hoel" you think better to all, god make your life better & better. be honest with your work & with passion then you got more option for carrier , you make goodwill of your work, take hard efforts for her, take every work serious, take care of proper option, think 4 time on your option it is true or false then final do it, you fell success & confident, he also says all things observe with positive eyes/negative eyes try to negative point convert in positive side
God blessing my fathers soul, he was in my heart, but now he stay with god from 12-2-2014
Dilip Sutar& family
[Image 240.jpg]


यात्रा बाबा आमरनाथची

           "यात्रा बाबा अमरनाथ"
------------------------------------------------
आम्ही बावडेकर बाबा अमरनाथ यात्रेकरीता जर वर्षे प्लान करतो, या आमचे जोतिबाला दर रविवारी पहाटे दर्शन जाणारे सहकारी मित्रांनी ठरवलं जायच, बाबा अमरनाथ दर्शनाला पाचजणांची तयारी झाली. मी स्वतः, राज पाटील, नितीन पारखे, शितल, प्रशांत नावडे, आम्ही रेल्वेने प्रवास सुरू केला,श्रीनगरला पोहचलो, तेथून गाडी ठरवली व बेस कॅम्प वर  पोहचलो प्रवास    खुप झालेन थोडीशी विश्रांती घेऊन फ्रेश होऊन साधारण 8/9 वाजता चढाई सुरुवात करायची होती, वेळ सकाळीची असल्याने भंडारा मधे सर्वजण नाश्ता करून चालत होते. भंडारा मधे विविध प्रकारच्या मेजवानीच असते त्याचा आस्वाद घेत आता खरी चढाईला सुरुवात होते जय बाबा अमरनाथ गजर करीत यात्रा सुरू झाली. अत्यंत कठीण खडतर चढाई असल्याने जयघोष करीत चालण चालू ठेवलं.
      सर्वजण बरोबर चालत होतो आमचे सह असंख्य यात्रेकरू चालत होते, पहील्या टप्प्यातच दमछाक होत होती, साधारणपणे आम्ही एक तास चालल्यानंतर आमच्या मधील दोघेजण खुपच दमलेले दिसत होते आणि म्हणू लागले "आता चढाई करणे अशक्य आहे बाबा" आम्ही सर्वजण थोडा वेळ विश्रांती घेऊन मग पुढे जाऊ अस ठरवलं, 10/15 मिनिटे विश्रांतीनंतर चला निघु आता, पण जे दमलेले दोघे म्हणाले आम्हाला शक्य नाही होणार, अजुन कीती वेळ चालायला लागेल याचा अंदाज नाही, आम्ही घोड्यावर बसून येतो, आम्ही सगळे विनंती केली करू लागलो हळूहळू चालू पण चालत जाऊ....
       तितक्या एक अंदाजे 55/60 वर्षे वय असलेला गृहस्थ चालत येत होता, तो बाबा अमरनाथ गजर करीत चालत होता "बंब भोले, बाबा अमरनाथ की जय हो" लांबून तो जरा अडखळत चालत असल्या सारखा वाटत होता, जसजसा तो जवळ आला, आम्ही आश्चर्य चकीत झालो, कारण असे की या गृहस्थाचे पाय पाहीले तर दोन्ही पाय आतील बाजूस वळलेले असून हा गृहस्थ एक तास अंतर इतक्या सहजपणे वर चढाई करत उत्साहाने चालत होता. मी तर आवाक् झालो. सर्वच आम्ही अचंबित झालो. मग आम्ही त्याची विचारपूस केली आणि ते म्हणाले मी जर वर्षे बाबा अमरनाथ यात्रा करतो. या देवावर माझी आगाध श्रद्धा आहे. आम्ही म्हणालो "बाबा तुमचे पाय असे असुनही कसे चालता हो" त्यावर त्यांनी सांगितले "देवाची इच्छा मला कधीही त्रास वाटला नाही या यात्रेचा" आणि त्या गृहस्थाने परत आपली यात्रा सुरू केली
  मी आमचे सहकारी मित्र चर्चा करू लागलो "जर असा अपंग व्यक्ती जर यात्रा परिपूर्ण करीत असेल तर आपण तर धडधाकट आहे, आपण का नाही यात्रा पुर्ण करू शकत?" मग आम्हाला नवीन उर्जा मिळाली आणि आम्ही यात्रेस सुरूवात केली ते दोन टप्प्यात विश्रांती घेत दुपारी तीन वाजता अमरनाथ गुहा दिसु लागली. तेव्हा उत्साहात भर पडत गेली. मग बर्फाच्छादित पहाडवरून चालण्याचा एक विलक्षण आनंद मिळत होता. आता गुहे पर्यंत पोहचलो. थोडा आराम केला आणि मग बर्फाच्छादित शिवलिंगाचे दर्शन झाले. मन प्रसन्न झाले. देवाची प्रार्थना केली, प्रसाद घेतला, देवाकडे मागन घातले "असच आमच मनोधैर्य उंच राहु दे" आणी परत प्रवास दुसर्‍या दिवशी पहाटे चार वाजता चालु केला.
तात्पर्य या प्रसंगातून एक बोध असा की    "एखाद्याची श्रद्धा इतकी दाट असलेवर कोणतीही गोष्ट आयुष्यात अशक्य नाही"
"जय बाबा अमरनाथ "
दिलीप सुतार
कसबा बावडा, कोल्हापूर
गृहस्थाचा फोटो
[Image 226.jpg]
[Image 228.jpg]
[Image 229.jpg]